ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्री देव रामेश्वर कांदळगाव 'वेशी फिरणे' कार्यक्रमाची रूपरेषा.

श्री देव रामेश्वर कांदळगाव 'वेशी फिरणे' कार्यक्रमाची रूपरेषा.

प्रकाशन: 07 Feb 2025 04:17 AM
वाचन संख्या 406

कांदळगांव येथे ९ फेब्रुवारी २०२५ ते १४ फेब्रुवारी २०२५ कालावधीत ‘वेशी फिरणे’ कार्यक्रम संपन्न होत आहे. श्री देव रामेश्वर देवस्थानचा पारंपारीक स्वयंभू श्री देव रामेश्वर पालखी, तरंग, राणे – परब मानकरी आणि रयत मंडळींसह वेशी फिरणे असा कार्यक्रम आहे.

या कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे.

९ फेब्रुवारी रोजी श्री देव रामेश्वर मंदिर, कांदळगाव येथून दुपारनंतर कोळंब मांगरी येथे प्रस्थान, १० फेब्रुवारी रोजी कोळंब मांगरी येथील देव महापुरुष येथे दुपारी महाप्रसाद, ११ फेब्रुवारी रोजी न्हिवे येथे दुपारी महाप्रसाद, दुपारनंतर महान येथे प्रस्थान, १२ फेब्रुवारी रोजी दुपारी महान गांगेश्वर मंदिर येथे महाप्रसाद, दुपारनंतर कांदळगाव सातेरी मंदिर येथे प्रस्थान, १३ फेब्रुवारी रोजी सकाळी सातेरी मंदिर येथून कांदळगाव साळकरवाडी कडे प्रस्थान, तिथून माघारी येताना परबवाडी मोठ्या तुळशीजवळ महाप्रसाद, दुपारनंतर रवळनाथ मंदिर येथे प्रस्थान, १४ फेब्रुवारी रोजी रवळनाथ मंदिरातून राणेवाडी येथे प्रस्थान, दुपारी राणेवाडी मध्यवर्ती मोठी तुळस येथे महाप्रसाद, दुपारनंतर श्री देव रामेश्वर मंदिर येथे रवाना, रात्री श्री रामेश्वर मंदिर येथे रितीरिवजानुसार ‘वेशी फिरणे’ कार्यक्रमाची सांगता.

वेशी फिरणे कार्यक्रमात भाविकांनी उत्स्फूर्तपणे व मोठ्या संख्येने उपस्थित रहायचे आवाहन श्री रामेश्वर मंदिर, कांदळगाव देवस्थानच्या तर्फे करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स