ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कुडाळ येथे आज भाजपा कार्यकर्ता मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती..

कुडाळ येथे आज भाजपा कार्यकर्ता मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती..

प्रकाशन: 29 Oct 2021 11:33 AM
वाचन संख्या 74

जि.प.अध्यक्ष सौ.संजना सावंत ,आम.नितेश राणे व एड.संग्राम देसाई यांचा होणार विशेष सत्कार

चिंदर | विवेक परब : आज कुडाळ येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले जात असून यावेळी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण,भाजपा प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे,माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार,प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत,तसेच सर्व प्रमुख जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत . या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब हे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. केंद्रात महत्वाचे खाते मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे . तसेच ई सेवाश्रम व कणकवली मतदार संघातील सर्व सरपंचांचा विमा उतरवला या बद्दल आमदार नितेश राणे साहेब तसेच बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी ऍड . संग्राम देसाई व जिल्हा लसीकरणात राज्यात पहिला आल्याबद्दल व स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.संजना सावंत या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना केंद्रात मिळालेल्या महत्वाच्या खात्याच्या माध्यमातून कोकणात जास्तीत जास्त रोजगार उद्योगधंद्यांची निर्मिती व्हावी या करिता प्रयत्नशील राहावे अशा सूचना केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांनी दिल्या व त्या पद्धतीने काम सुरू झालेले आहे.

या संधीचा लाभ घ्यावा.या दृष्टीने जिल्ह्यात एक फार मोठे ट्रेनिंग सेंटर सुरू होणार आहे.त्यासाठी २० एकर जागेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली असुन तो पर्यंत कुडाळ एमआयडीसी येथे हे ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात येईल.खादी ग्रामोद्योग यासाठीही विशेष जागेची मागणी करण्यात आली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स