ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
ससून डाॅकचा विकास…

ससून डाॅकचा विकास…

प्रकाशन: 14 Jul 2025 11:06 PM
वाचन संख्या 245

मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केली कटीबद्धता.

मुंबई | ब्यूरो न्यूज : ससून डॉक येथील कोळी व मच्छीमार बांधवांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू, असा विश्वास मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विधान परिषदेत दिला.

विधान परिषदेत ससून डॉक संदर्भातील परिषद सदस्यांच्या लक्षवेधी सूचनांवर चर्चेला उत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी हे स्पष्ट केले. यावेळी आमदार राजेश राठोड, आमदार चित्रा वाघ, आमदार शिवाजीराव गरजे, आमदार सचिन अहिर यांनी लक्षवेधी मांडल्या.

मुंबईवर पहिला अधिकार कोळी समाजाचा, मच्छिमार बांधवांचा आहे, सांगून ससून डॉक परिसराला पूर्णपणे विकसित करून दर्जेदार सुविधा देण्याचे शासनाचे धोरण आहे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

ससून डॉक परिसरातील मच्छीमार बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन महाराष्ट्र मत्स्य उद्योग महामंडळ आणि मत्स्य व्यवसाय विकास महामंडळामार्फत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून, यासाठी ९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यापैकी २२ कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून, त्यामध्ये आवश्यक मूलभूत सुविधांवर भर दिला जात आहे. या निधीतून आतापर्यंत ससून डॉक परिसरात कार्पेट, सहा आसनी चार कॅन्टीन टेबल, पंखे, सहा खुर्ची, लाईट व मोबाईल चार्जिंग पॉईंट, पुरुष – महिला कक्षांसह दहा शौचालये (दोन युनिटस्), पिण्याच्या पाण्यासाठी एमएमसी शेड व वॉटर कुलर, यांसारख्या सुविधांची उभारणी पूर्ण झाली आहे.

पाळणाघर उभारणीसाठी देखील शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शेडमध्ये योग्य स्वयंसेवी संस्था नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे. शिवाय, घनकचरा व्यवस्थापन, शिवभोजन योजना अशा अनेक मागण्या जय मल्हार मत्स्य उद्योग सहकारी संस्थेच्या २११ सभासदांकडून शासन दरबारी मांडण्यात आल्या आहेत. प्लास्टिक मुक्त कोळीवाडा अभियान सुद्धा ससून डॉकसह इतर ठिकाणी हाती घेतले असून, मासे विकल्यानंतर उरलेला कचरा थेट समुद्रात न टाकता, त्यासाठी वेगळा प्रकल्प राबवण्याचे नियोजन सुरू आहे. यासाठी काही खासगी कंपन्यांशी चर्चा सुरू असून, कचरा व्यवस्थित उचलून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली जाईल, नितेश राणे म्हणाले.

उपसभापती नीलम गोरे यांनी मंत्री नितेश राणे यांचे केले कौतुक

या चर्चेदरम्यान उपसभापतींनी मंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या उत्तरा बद्दल समाधान व्यक्त केले. विरोधी सदस्यांना सूचित केले की मंत्री नितेश राणे हे खूप चांगल्या पद्धतीने उत्तरे देत आहेत. या चर्चेतून मच्छीमारांना निश्चितच फायदा होईल. त्यामुळे भविष्यात ज्या सदस्यांना ससून डॉक संदर्भातील प्रश्न सुटावेत आणि मच्छीमारांना न्याय मिळावा वाटते त्यांनी या चर्चेत भाग घेऊन पुन्हा ज्यावेळी बैठक लावली जाईल त्यावेळीही उपस्थित राहावे आवाहन उपसभापती यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स