ओवळीये गावचे रहिवासी व सावंतवाडीचे शिक्षक सुनील जंगम यांची गळफास घेऊन आत्महत्या.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील ओवळीये जंगमवाडी गावचे रहिवासी व सावंतवाडी येथील माध्यमिक शाळेचे शिक्षक सुनील बाबी जंगम (वय ५२ वर्षे) यांनी ओवळीये देव साखळी नदी ब्रिजकडे रेलिंगला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवार, १४ जुलै रोजी सकाळी दिसून आली.
आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत जंगम हे सावंतवाडी येथील एका हायस्कूलवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी कर्जावर डंपर घेतलेले होते. त्या कर्जाचे हप्ते थकीत झाल्यामुळे ते मानसिक तणावात होते. यातूनच त्यांनी देवसाखळी नदी ब्रिजकडे रेलिंगला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवले, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या पत्नीचा जबाब आचरा पोलीसांनी नोंद केला आहे.
सदर घटनेचा तपास आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक व्ही. सी. टेंबूलकर, करत आहेत. सुनील जंगम यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)