विमान अपघात पार्श्वभूमीवर आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी.
ब्यूरो न्यूज : गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवार, १२ जून रोजी दुपारी १:३० च्या सुमारास लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. अहमदाबाद येथून एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ केल्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच हे विमान शहरातील नागरी वस्तीतील एका इमारतीला धडकून खाली कोसळले आणि आगीचे लोळ उठले, प्रचंड मोठा स्फोट झाला.
दरम्यान आता या अपघातानंतर एअर इंडियाकडून एक आपत्कालीन संपर्क क्रमांक (हेल्पलाइन नंबर) जारी करण्यात आला आहे. एअर इंडियातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रवासी हॉटलाइन क्रमांक 1800 5691 444 हा सुरू करण्यात आला आहे. या अपघातातत होरपळलेल्या लोकांना, जखमी प्रवाशांना, जखमींना जवळच्या रुग्णालयात नेले जात आहे असे एअर इंडियाने सोशल मीडिया साइट एक्स वरील पोस्टमधये नमूद केले आहे.
अहमदाबादहून गुरूवारी दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी निघालेल्या बोइंग 787-8 या फ्लाईटमध्ये २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यांपैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते, माहिती मिळत आहे.
या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत असल्याचे एअरलाइनने म्हटले आहे. एअर इंडिया त्यांच्या एक्स हँडल (https://x.com/airindia) आणि http://airindia.com वर नियमित अपडेट्सद्वारे पुढील माहिती प्रसिद्ध करणार आहे.
सौजन्य : अहमदाबाद ब्यूरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)