मालवण मेढा येथे मच्छीमारी नौका समुद्रात उलटली.
दोघे मच्छीमार बचावले, एक मच्छीमार बेपत्ता.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका वारा आणि लाटांच्या माऱ्यात पलटी होऊन ३ मच्छीमार पाण्यात फेकले गेले अशी माहिती मिळत आहे. यात दोघेजण बचावले असून एक मच्छीमार बेपत्ता आहे. स्थानिक मच्छिमारांकडून त्याचा समुद्रात शोध सुरू आहे. ही घटना ८ जुलै पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.
घटनास्थळी मालवण पोलिस निरीक्षक मारुती जगताप, महादेव घागरे यांनी भेट देत माहिती घेतली. अपघातातील मासेमारी नौका किनाऱ्यावर आणण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील मेढा जोशी वाडा येथील कीर्तीदा लीलाधर तारी (वय २९), सचिन सुभाष केळुसकर (वय – ४२), विजय वाघ (वय – ३५) हे तीन मच्छीमार आज सकाळी मेढा राजकोट येथील समुद्रात सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान मासेमारी करण्यासाठी गेले होते. यावेळी समुद्रात जोराचा वारा व मोठ्या लाटांच्या तडाक्यात मासेमारी नौका पलटी झाली. हे तीनही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. या अपघातात कीर्तीदा तारी व सचिन केळुसकर हे सुखरूप किनाऱ्यावर पोहत पोहोचले. मात्र वाघ हा समुद्राच्या पाण्यात पडून बेपत्ता झाला आहे. स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने त्याचा समुद्रात शोध सुरू आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)