ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव.

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात १० जुलै रोजी गुरुपौर्णिमा उत्सव.

प्रकाशन: 09 Jul 2025 05:50 PM
वाचन संख्या 41

मसुरे | प्रतिनिधी : अक्कलकोट श्री वटवृक्ष मंदिरात गुरुवार, १० जुलै रोजी सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तीभावाने गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न होणार असल्याची माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.

या मंदिरात येणारे भाविक स्वामींना गुरु मानून या दिवशी दर्शनाकरीता विशेष गर्दी करतात. गुरुंचे गुरु, सदगुरुंचे गुरु तथा गुरुंचा महिमा म्हणजे येथील वटवृक्ष निवासी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, मंदिरात येण्यासाठी एक रस्ता, बाहेर जाण्यासाठी एक रस्ता, दोन ठिकाणी चप्पल स्टँड, साऊंड सिस्टीमवर स्वामींच्या भक्तीगीतांचे वादन, विशेष दर्शन रांगेचे नियोजन, पावसापासून संरक्षणा करीता दक्षिण महाद्वार ते गेटपर्यत पत्राशेड उभा करण्यात आले आहे.

गुरुपौर्णिमेदिवशी वटवृक्ष मंदिरात नित्य नियमाने होणारी काकड आरती पहाटे ४ वाजता होईल. यानंतर पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते गुरुपुजन होईल. तत्पूर्वी सालाबादाप्रमाणे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता व भाविकांना स्वामी दर्शन सुलभतेने होण्याकरीता मंदिराचे महाद्वार गुरुपौर्णिमे रोजी रात्री २ वाजता उघडण्याचा व गर्दीच्या अनुषंगाने मंदिरात स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदीर समितीने घेतला आहे. भाविकांनी अभिषेकाची पावती केल्यास प्रसाद मिळेल. सकाळी ११:३० वाजता नियमितपणे संपन्न होणारी महानैवेद्य आरती गुरुपौर्णिमे रोजी सकाळी १०:३० वाजता संपन्न होईल. दुपारी १२ ते ३ या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी- गाणगापूर रोडवरील भक्त निवास येथे सर्व स्वामी भक्तांसाठी भोजन महाप्रसादाची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. दर गुरुवारी रात्री ८ वाजता मंदिरात साजरा होणारा श्रींचा पालखी सोहळा गुरुपौर्णिमे रोजी रात्री ७ वाजता संपन्न होईल व यानंतर लगेच शेजारती संपन्न होईल याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी. येणाऱ्या स्वामी भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा, सेवेचा व भोजनप्रसादाचा व मंदीरातील श्रींच्या पालखी सोहळ्याचा लाभ घ्यावा, आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा मा. नगरसेवक महेश इंगळे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स