शिरोडा- वेळागर समुद्रात बुडालेल्या आणखी २ पर्यटकांचे मृतदेह मिळाले.
शिरोडा- वेळागर समुद्रात बुडालेल्या आणखी २ पर्यटकांचे मृतदेह मिळाले.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : ३ ऑक्टोबर २०२५ रोजी शिरोडा - वेळागर येथील समुद्रात सायंकाळी ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली होती त्यानंतर ४ ऑक्टोबर रोजी २ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ३ ऑक्टोबर रोजी, ३ पर्यटक मृतदेह मिळाले होते. एक पर्यटक (महिला) श्रीमती. इसरा इमरान कित्तूर, वय १७ रा. लोढा, बेळगाव हिला वाचविण्यात यश आलेले होते.
श्रीम. नहिदा फरीन इरफान कित्तूर, वय ३४, रा. लोंढा, बेळगाव (मयत), श्री. इबाद इरफान कित्तूर , वय १३ , रा. लोंढा, बेळगाव (मयत), कु. नमीरा अफताब अख्तार, वय १६, रा. अल्लावर, बेळगाव (मयत) या ३ पर्यटकांच्या मृतदेहांना ४ ऑक्टोबर रोजी बाहेर काढण्यात आले होते अशी माहिती मिळाली होती.
बेपत्ता पर्यटकांची शोध घेण्यासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात आलेल्या शोध माहिमेत ४ ऑक्टोबर रोजी पुढील २पर्यटकांचे मृतदेह शोध व बचाव पथकास मिळालेले आहे.
१) श्री. इकवान इमरान कित्तूर, वय १५, रा. लोढा, बेळगाव (मयत), श्री. फरहान मोहम्मद मणियार, वय २० रा. कुडाळ, सिंधुदुर्ग (मयत).
या घटनेतील बेपत्ता पर्यकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१) श्री. इरफान मोहम्मद इसाक, कित्तूर, वय ३६, रा. लोंढा, बेळगाव, २) श्री. जाकीर निसार मणियार,वय १३, रा. कुडाळ, सिंधुदुर्ग.
घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. शोध व बचाव मोहिमेसाठी कोस्टगार्ड रत्नागिरी यांची मदत देखील घेण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)