ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
शिरोडा समुद्रात आठ पर्यटक बुडाले.

शिरोडा समुद्रात आठ पर्यटक बुडाले.

शिरोडा समुद्रात आठ पर्यटक बुडाले.



सिंधुदुर्ग नगरी | ब्यूरो न्यूज : ३ ऑक्टोबर २०२५ रोजी शिरोडा - वेळागर येथील समुद्रात दुपारी ४ : ४५ च्या दरम्यान ८ पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. या पर्यटकातील ४ जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आलेले होते. यातील ३ पर्यटक मयत असून एक पर्यटक (महिला) अत्यवस्थ आहे. सदर महिलेस शिरोडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. उर्वरित ४ पर्यटकांचा शोध स्थानिक शोध व बचाव पथक मार्फत सुरू आहे. 

 

समुद्रातून बाहेर काढलेल्या, १. इसरा इम्रान कित्तूर, वय वर्ष १७ रा. लोंढा, बेळगाव (वाचली आहे), २. श्रीमती फरहान इरफान कित्तूर, वय ३४, रा. लोंढा, बेळगाव (मयत), ३. श्री इबाद इरफान कित्तूर , वय १३ रा. लोंढा, बेळगाव (मयत), ४. श्रीमती नमीरा आफताब अख्तर वय १६, रा अल्लावर, बेळगाव (मयत) अशी माहिती मिळत आहे.


बेपत्ता पर्यटकांची नावं, पत्ता आणि वय, १. इरफान मोहम्मद इसाक कित्तूर, वय ३६ रा. लोंढा, बेळगाव, २. इक्वान इमरान कित्तूर, वय १५ रा. लोंढा, बेळगाव, ३.फरहान मोहम्मद मणियार, वय २०, रा. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, ४ जाकीर निसार मणियार वय १३, रा. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग असे असल्याचे समजते.


घटनास्थळी पोलीस, महसूल व ग्रामीण विकास विभागाची यंत्रणा उपस्थित असून सदर प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत बेपत्ता पर्यटकांचा शोध सुरू आहे. तरी कृपया नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

रस्त्याच्या कडेला अवैधपणे वाहने उभी करणे किंवा विनाकारण वाहने थांबविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यात वाहतूक टास्कफोर्सची स्थापना.

लोकप्रिय टॅग्स