युवासेनेच्या वतीने कलमठ बाजारपेठ शाळेत 'मराठी विजय दिवस' साजरा.
कणकवली | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी सक्तीने तिसऱ्या भाषेच्या रूपात शिकवण्याचा आदेश दिला होता. मात्र, मराठी जनतेच्या विरोधानंतर सरकारला दोन्ही जीआर रद्द करावे लागले.
या पार्श्वभूमीवर कलमठ बाजारपेठ शाळेत ग्रामपंचायत सदस्य व युवासेना शहर प्रमुख श्री. धीरज मेस्त्री यांच्या वतीने मिठाई वाटून ‘मराठी विजय दिवस’ साजरा करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक विलास गूडेकर, तालुका संघटक राजू राठोड, माजी सरपंच धनश्री मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य जितू कांबळी, मेस्त्री आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)