सिंधुदुर्ग महाविद्यालयाची चैताली कुणकवळेकर अर्थशास्त्र विभागात जिल्ह्यात अव्वल.
| ब्यूरो न्यूज : स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय कॉलेजच्या चैताली कुणकवळेकर आणि लक्ष्मी पारकर यांनी तृतीय वर्ष कला विभागातून अर्थशास्त्र विषयामध्ये (सिक्स इकॉनॉमिक्स) पहिला आणि दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे. चैताली कुणकवळेकर ९.५८ ग्रेड घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरली असून लक्ष्मी पारकर ही ९.४३ ग्रेड घेऊन जिल्ह्यात दुसरी आली आहे. त्याचबरोबर कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
चैताली कुणकवळेकर आणि लक्ष्मी पारकर या स्पेशल इकॉनॉमिक्स (Six Economics ) तृतीय वर्ष शाखेमध्ये शिकत होत्या. त्यांना अर्थशास्त्राचे प्रा. डॉ.डी. व्ही हरगिले, प्रा. डॉ. मल्लेश खोत, प्रा. प्रमोद खरात यांचे मार्गदर्शन लाभले. सिंधुदुर्ग कॉलेजच्या या विद्यार्थिनीने ९.५८ ग्रेड मिळवून जिल्ह्यात आणि युनिव्हर्सिटी मध्ये अव्वल स्थान निर्माण केलेले आहे. याबद्दल प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अर्थशास्त्राचे प्रा. डॉ. देविदास हरगिले, प्रा. डॉ. मल्लेश खोत, प्रा. प्रमोद खरात, प्रा. शंकर खोबरे, तावडे सर, मीनल सावंत, विभा मॅडम तसेच ऑफिस स्टाफ उपस्थित होता.
कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर, सीडीसी अध्यक्ष समीर गवाणकर, सेक्रेटरी गणेश कुशे, शालेय समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण, कृ सी देसाई शिक्षण संस्थेचे सर्व संचालक मंडळ, संदेश कोयंडे, प्रमोद ओरसकर, डॉक्टर झाटये, विजय केनवडेकर, भाऊ सामंत, महादेव पाटकर व इतर पदाधिकारी या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले . तसेच कॉलेजचे सर्व प्राध्यापक, ऑफिस स्टाफ, लायब्ररी स्टाफ, मधील पदाधिकारी आणि पत्रकार संघटना यांनीही कौतुक केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)