मालवण रेवतळे येथे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ.
मालवण | ब्यूरो न्यूज : रुपेश करलकर आणि उमेश चव्हाण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एक गाव एक संघ’ पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचा गुरुवार, ३ जुलै रोजी रेवतळे मालवणमध्ये शुभारंभ झाला. हरी खोबरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
ही स्पर्धा ३ जुलै ते ६ जुलै दरम्यान खेळवली जात असून, यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध संघांनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी हरी खोबरेकर, मनोज मोंडकर, बाबी जोगी, उमेश मांजरेकर, चिंतामणी मयेकर, दत्ता पोईपकर, उमेश चव्हाण, रुपेश करलकर, बंड्या सरमळकर, अमय मांजरेकर, सुनील मालवणकर, डॅनिस फर्नांडिस, संदीप पार्टे, एमरोस अल्मेडा, विशाल लुडबे, क्रिकेटप्रेमी आणि मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्या संघाला २५,०००/- रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला १५,०००/- रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येईल. संघांच्या यशासोबतच वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. यामध्ये फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित केले जाईल.
या स्पर्धेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा प्रवेशिकेसाठी इच्छुक संघ आणि खेळाडूंनी पायस अल्मेडा (९३०७९१५१४१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)