ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
बास्केटबॉल ज्युनिअर राज्य स्पर्धेसाठी २ ऑगस्ट रोजी जिल्हा निवड चाचणी.

बास्केटबॉल ज्युनिअर राज्य स्पर्धेसाठी २ ऑगस्ट रोजी जिल्हा निवड चाचणी.

प्रकाशन: 30 Jul 2025 01:20 PM
वाचन संख्या 256


मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन आयोजित व पुणे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या नियोजनात श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे दिनांक ९ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२५ रोजी ७५ व्या ज्युनिअर मुले व मुली बास्केटबॉल राज्य स्पर्धा खेळवल्या जात आहेत.


या राज्य स्पर्धेत सहभागी होणार्या संघाच्या निवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशन ने श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचलित, डॉक्टर श्रीधर सिताराम कुडाळकर हायस्कूल मालवण च्या बास्केटबॉल मैदानावर शनिवार दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता निवड चाचणीचे आयोजन केले आहे.


ज्या खेळाडूंची जन्म तारीख ०१/०१/२००७ नंतरची असेल अशा खेळाडूंना या निवड चाचणी मध्ये सहभागी होता येईल आणि निवड चाचणी साठी येताना खेळाडूंनी सोबत आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र (ओरीजिनल) सोबत घेऊन यायचे आहे. निवडचाचणी मध्ये जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष श्री सुरेंद्र सकपाळ यांनी केले आहे. 


अधिक माहितीसाठी सचिव अजय शिंदे (९४२२३९४१८६ ) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती मिळत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स