ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
कुछ याद उन्हेभी करलो….!

कुछ याद उन्हेभी करलो….!

प्रकाशन: 28 May 2025 10:52 PM
वाचन संख्या 100

आयपीएल २०२५ चा समारोप समारंभ भारतीय सैन्यदलांना समर्पित.

संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, थलसेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौसेना प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह उपस्थित रहाणार.

क्रीडा | ब्यूरो न्यूज : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२५ चा समारोप समारंभ भारतीय सैन्यदलांना समर्पित करण्याची घोषणा केली आहे.

हा सोहळा ३ जून २०२५ रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. याच दिवशी आयपीएलचा अंतिम सामना होणार असून, त्यापूर्वी हा समारोप सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. या सोहळ्यात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कारवाईसाठी भारतीय सैन्यदलांचा सन्मान केला जाणार आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. या ऑपरेशन अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले होते. या हल्ल्यात १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यावेळी आयपीएल एक आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले होते.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरमधील वीरांचा सन्मान करण्यासाठी बीसीसीआयने खास योजना आखली आहे. अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयने तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांना निमंत्रित केले आहे. त्यामुळे समारंभाला संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, थलसेना प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौसेना प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी आणि वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह उपस्थित राहणार आहेत. या समारंभात सैन्यदलांचे बँड सादरीकरण आणि देशभक्तीपर गीते सादर केली जाणार आहेत.

यासंदर्भात बोलताना बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया म्हणाले, “आम्ही आमच्या सैनिकांच्या शौर्य, धैर्य आणि निःस्वार्थ सेवेला सलाम करतो. ऑपरेशन सिंदूरमधील त्यांच्या पराक्रमाने देशाला सुरक्षित ठेवण्याचे कार्य केले आहे. म्हणूनच आम्ही आयपीएल २०२५ चा समारोप समारंभ सैन्यदलांना समर्पित करत आहोत.”

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ प्रत्येक सामन्यात मोठ्या पडद्यांवर “Thank You, Armed Forces” असे संदेश प्रदर्शित केले जात आहेत. तसेच, सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गायले जात आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स