ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
लायन्स क्लब मालवण तर्फे सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ.

लायन्स क्लब मालवण तर्फे सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ.

प्रकाशन: 03 Jul 2025 10:52 PM
वाचन संख्या 69

डाॅक्टर्स, कृषी अधिकारी व चार्टर्ड अकाउंटंट यांचा कल्पवृक्ष भेट देऊन सन्मान.

मालवण | ब्यूरो न्यूज : लायन्स क्लब मालवणची सन २०२५ – २६ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणी निश्चित करण्यात आली आहे. नूतन अध्यक्षा सौ. अनुष्का चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवीन कार्यकारिणीने सामाजिक उपक्रमांचा शुभारंभ केला आहे. मंगळवार, १ जुलै रोजी डॉक्टर्स डे, कृषी दिन व चार्टर्ड अकाऊंटंट डे या दिनांचे औचित्य साधून मालवण मधील डॉक्टर, कृषी अधिकारी व चार्टर्ड अकाऊंटंट यांचा लायन्स क्लब तर्फे कल्पवृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला.

डॉक्टर डे निमित्ताने डॉ. दर्शन खानोलकर, डॉ. यज्ञा तारी (रेडकर हॉस्पिटल), डॉ. संजय पाटील, डाॅ.जुई देसाई (दंतचिकित्सक), डॉ. पंकज दिघे, डॉ. सचिन दिघे, डॉ. अश्विन दिघे (दिघे हॉस्पिटल), डॉ. शशिकांत झाटये, डॉ. मालविका झाटये, डॉ. अमोल झाटये (अंकुर हॉस्पिटल), डॉ. विणा मेहेंदळे (मसुरे), डॉ. हरिश परुळेकर (बालरोगतज्ञ), डॉ. राजन लांडगे, डॉ. रजत दळवी (पशुवैद्यकीय अधिकारी) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कृषी दिनानिमित्त श्री. दत्तात्रय मस्कर, सौ. संजीवनी वाघमारे (कृषी अधिकारी) यांचा तसेच चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) दिनानिमित्त सीए युगांत चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कृषी दिन निमित्ताने मालवणमधील श्री माघी गणेश मंदिर परिसर, नागेश्वर संकुल, बांगीवाडा येथे कल्पवृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी लायन्स क्लब मालवणच्या नूतन अध्यक्ष सौ. अनुष्का चव्हाण, सचिव सौ. मनाली दळवी, खजिनदार सौ. पूनम चव्हाण यांच्यासह मावळते अध्यक्ष महेश अंधारी, लायन्स सदस्य गणेश प्रभुलकर, विश्वास गावकर, राजा शंकरदास, मुकेश बावकर, शांती पटेल, उमेश शिरोडकर, सचिन शालबिद्रे, सहदेव बापार्डेकर, अरविंद ओटवणेकर, रुजारिओ पिंटो, महेश कारेकर, जयश्री हडकर, स्वप्नाली नेरुरकर, गीता आचरेकर, नंदिनी गावकर, दीक्षा गावकर, राधिका मोडकर, सारिका मोडकर, पल्लवी तारी, ऋग्वेदा धामापूरकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स