मालवणात भाजपाच्या वतीने आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदी निवडीबद्दल जल्लोष.
मालवण | ब्यूरो न्यूज : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड जाहीर झाली. यानंतर मालवण भाजपा कार्यालय येथे भाजपा पदाधिकारी यांनी जल्लोष केला. मालवण शहर पिंपळपार येथे फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा पक्ष आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या गौरवार्थ विजयी घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपा पदाधिकारी तथा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक अशोक तोडणकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, बबन परुळेकर, अशोक चव्हाण, बबन परुळेकर, उद्योजक केदार झाड, उद्योजक सौरभ ताम्हणकर, कुंभारमाठ उपसरपंच जीवन भोगावकर, दिलीप सांगावेकर, दादू डिचोलकर, गणेश सातार्डेकर, शाम झाड, राम चोपडेकर, संदीप बोडवे, किशोर खानोलकर, नंदू देसाई, रवी टेंबूलकर, देवेंद्र चव्हाण, जयवंत सावंत यांसह अन्य पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी माजी नगरसेविका पूजा करलकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, माजी नगरसेविका महानंदा खानोलकर, आनंदव्हाळ सरपंच रश्मी टेंबुलकर, अमिता निवेकर, वैष्णवी मोंडकर, राणी पराडकर, तारका चव्हाण, चित्रा हरमलकर, स्मिता प्रभाळे, नंदिता हडकर, अपर्णा सावंत यांसह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)