ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.

कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.

प्रकाशन: 13 Jun 2025 06:43 PM
वाचन संख्या 40

कणकवली | प्रतिनिधी : पत्रकारांच्या पाल्यांनी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन करून स्वत:च्या कुटुंबाचे नाव रोशन केले आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. पत्रकार पाल्यांनी यापुढील शैक्षणिक प्रवासात यशात सात्यय ठेवून आपण जीवनात जे ध्येय ठेवले आहे, त्याच्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची परिकाष्ठा करावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे यांनी केले. कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा पंचायत समितीच्या प. पू. भालचंद्र सभागृहात आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. दिवे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, मराठी राज्य पत्रकार संघाचे परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंता श्री. घेवडे, कणकवली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे, पोलीस उपनिरीक्षक महेश शेगडे, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, उपाध्यक्ष संतोष राऊळ, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके , सचिव संजय सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संतोष वांयगणकर, जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, रमेश जोगळे, नंदू कोरगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. मंगेश वालावलकर म्हणाले की, पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्याचा तालुका पत्रकार संघाचा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. यापुढील काळात संघाने समाजोपयोगी उपक्रम राबवत रहावे.

श्री. किशोर गवस म्हणाले की, बातम्या मिळविण्यासाठी पत्रकारांना नेहमीच धावपळ करावी लागते. पत्रकारांच्या पाल्यांचा तालुका पत्रकारसंघाने केलेल्या गुणगौरवामुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले असून हे प्रोत्साहन त्यांना भविष्यात यशाचे शिखर गाठण्यासाठी उपयुक्त ठरेल. कुटुंब व्यवस्थेत अमूलाग्र बदल झाल्याने कुटुंबातील लहान मुलाचे शारीरिक व मानसिक ताण – तणावाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना नैराश्य येते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येताना आपण भ्रष्टचार अथवा अप्रामाणिकपणे काम करणार नाही, असा दृढनिश्चिय करून जनतेची सेवा करण्यासाठी प्रशासकीय सेवेत यावे. विद्यार्थ्यांनी देशाचे चांगले नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करावे, असे त्यांनी आवाहन केले.

श्री. गणेश जेठे म्हणाले की, पत्रकारांच्या पाल्यांनी देशाचे चांगले नागरिक बनून जगात देशाचे नाव रोशन करण्याच्या योगदानात आपला खारीचा वाटा उचलावा.

जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष श्री. उमेश तोसरकर म्हणाले की, जिल्हा पत्रकार संघ कुटुंबाप्रमाणे प्रत्येक पत्रकाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पत्रकारांच्या हितासाठी जिल्हापत्रकार संघ काम करीत असून नवीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. कणकवली तालुका पत्रकार संघाचा पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळ्यासह अन्य उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

दहावीच्या परीक्षेत कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या विधी विरेंद्र चिंदरकर हिला माणिक दिवे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. आरंभी दर्पणकार आद्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला दिवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत पदाधिकारी यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान लोके यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत भावे यांनी केले. आभार प्रदर्शन संजय सावंत यांनी केले. यावेळी जिल्हा बॅंकेचे कर्मचारी उदय तावडे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात, अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाला पत्रकार, पाल्य व कुटुंबीय उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स