वैभववाडी येथे १४ जून रोजी रक्तदान शिबीर व रक्तदाता सन्मान सोहळा.
वैभववाडी | ब्यूरो न्यूज : १४ जून २०२५ रोजी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आरोग्य केंद्र, वैभववाडी येथे रोटरी क्लब ऑफ वैभववाडी आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर तसेच रक्तदाता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
तालुक्यातील युवा, महिला, पुरुष तसेच नवीन रक्तदान करण्यास इच्छुक रक्तदात्यांना आवाहन आहे की जागतिक रक्तदाता दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे आणि १४ जून २०२५ च्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी आवर्जून रक्तदान करावे, आवाहन रोटरी क्लब ऑफ वैभववाडी तालुकाध्यक्ष प्रशांत गुळेकर आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष राजेश पडवळ यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)