वीज कर्मचाऱ्यांचा रेनकोट भेट देऊन सत्कार.
वायरी भूतनाथ येथे उद्योजक केदार झाड यांचा उपक्रम.
मालवण : वीज कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने उद्योजक केदार झाड यांच्याकडून वीज कर्मचाऱ्यांना रेनकोट भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
वायरी भूतनाथ येथील हॉटेल मायरा येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्योजक केदार झाड, संदीप बोडवे, देवानंद लोकेगावकर, शाम झाड, मिलिंद झाड, रविंद्र खानविलकर, धनंजय रोगे, समीर गोवेकर, समीर पाटकर, लीलाधर झाड, विशाल वेंगुर्लेकर, जगदीश वेंगुर्लेकर, सुदेश पारकर, सुनील वेंगुर्लेकर, रुद्राक्ष कांदळकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी वायरी भूतनाथ येथील लाइनमन श्रीपाद चेंदवंदकर, योगेश परब, तारकर्ली येथील लाइनमन रामचंद्र आंबेरकर, देवली येथील लाइनमन प्रकाश मांजरेकर, देवबाग येथील लाइनमन सिद्धेश परब, गणेश पालव, अहिरे यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
वीज कर्मचाऱ्यांनी उद्योजक केदार झाड यांचे आभार मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)