ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बॅंकेकडून एक हजार कोटी रुपयांची तरतूद.

मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बॅंकेकडून एक हजार कोटी रुपयांची तरतूद.

प्रकाशन: 28 May 2025 09:44 PM
वाचन संख्या 44

मुंबई | ब्यूरो न्यूज : राज्य सहकारी बँकेने, मच्छीमारांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्य सहकारी बँकेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीला मत्स्यविकास मंत्री नितेश राणे, पदुमचे सचिव डॉ. रामास्वामी एन, मत्स्यआयुक्त किशोर तावडे, राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनासकर, व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

मत्स्य विभागाला कृषीचा दर्जा मिळाल्यानंतर मच्छीमारांचे जीवनमान आणखी उंचावे यासाठी मत्स्यविकास मंत्री नितेश राणे प्रयत्नशील आहेत. त्याच माध्यमातून आजच्या या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मच्छीमारांना आधुनिक बोटींसाठी, अवजारांसाठी, कोल्ड स्टोअरेजसाठी, अशा विविध कामांसाठी वित्तीय पुरवठ्याची गरज असते. यासाठी राज्य सहकारी बँकेच्या व जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्याच्या योजना आखण्याच्या सूचना मंत्री नितेश राणे यांनी केल्या. तसेच महिला मच्छीमारांसाठी प्रामुख्याने योजना बनवण्याच्या सूचनाही मंत्री राणे यांनी केल्या. राज्य सहकारी बँकेचे प्रशासक श्री. अनासकर यांनी यावेळी मच्छीमारांना योग्य ते सहकार्य करण्याचे सांगत जास्तीत जास्त अर्थपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासीत केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स