२३ मे ते १२ जूनपर्यंत पर्यायी मार्गांचा वाहतुकीसाठी वापर करून सहकार्य करा….!
मालवण नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने मुख्याधिकारी यांचे आवाहन.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहर नगरपरीषद हद्दितील आडारी घनकचरा केंद्र ते मालवणकर घरापर्यंत जाणारा रस्ता खोदाई करून क्रॉस ड्रेनेज कामासाठी पाईप टाकण्याचे काम पालिकेच्या बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या २३ मे ते १२ जून या कालावधीसाठी हा रस्ता वाहतुकीस बंद राहणार आहे. तरी सर्व नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)