ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भारतीय सैन्याच्या विजयाच्या जल्लोषार्थ तळेरेत तिरंगा यात्रा संपन्न.

भारतीय सैन्याच्या विजयाच्या जल्लोषार्थ तळेरेत तिरंगा यात्रा संपन्न.

प्रकाशन: 22 May 2025 04:08 PM
वाचन संख्या 52

कणकवली | ब्यूरो न्यूज : पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या उत्तरादाखल ऑपरेशन सिंदूरने मिळवलेल्या विजयाच्या सन्मानार्थ तसेच या विजयासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणाऱ्या त्रिदलातील, विशेषतः वायुदलातील सैनिकांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, युद्धात स्वतःचे प्राण समर्पण करून अमर झालेल्या वीरांप्रति आणि पहलगाम हल्ल्यात भारतीय म्हणून प्राण गमावलेले पर्यटक या सर्वांना कृतज्ञता अभिव्यक्त करण्यासाठी येथे तिरंगा यात्रा काढण्यात आली. स्वतःचा प्राण तळहातावर घेऊन शत्रूशी लढणाऱ्या तसेच वीरगती प्राप्त करणाऱ्या, देशातील नागरिकांना शत्रूपासून सुरक्षा आणि अभय देऊन सुखाचे घास खाऊ देणाऱ्या त्रिदलातील सैनिकांप्रति कृतज्ञता अभिव्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या शौर्यकर्तृत्वाला प्रेरणा देण्यासाठी आणि पाकिस्तानवरील भारताच्या विजयाचा सन्मान करण्यासाठी भव्यदिव्य तिरंगा रॅलीचे येथे आयोजन करण्यात आले.

या तिरंगा रॅलीचे एसटी स्थानकापासून आरंभ होऊन पूर्ण बाजारपेठेत फिरून पुन्हा एसटी स्थानक येथे विसर्जन झाले. ‘भारतीय लष्कराचा विजय असो!’, ‘जय जवान जय किसान !’ या जल्लोषपूर्ण घोषणांचा नाद येथे निनादला.

या तिरंगी यात्रेत नेतृत्व करणारे भाजपा मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर, महिला मंडलाध्यक्ष हर्षदा वाळके, कलाकार मानधन समिती जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, माजी जि. प. सदस्य संजय देसाई, डॉ. मिलिंद कुलकर्णी, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आण्णा खाडये, चे सरपंच हनुमंत तळेकर, पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय दुदवडकर, उपाध्यक्ष गुरु सावंत, सचिन राणे, संजय पाताडे, पंढरीनाथ वायंगणकर, सूर्यकांत भालेकर, च्या माजी सरपंच साक्षी सुर्वे, माजी उपसरपंच शैलेश सुर्वे, कासार्डे उपसरपंच गणेश पाताडे, ओझरम उपसरपंच प्रशांत राणे, दिपक नांदलसकर, दिनेश मुद्रस, शशांक तळेकर, राजु जठार, चंद्रकांत तळेकर, देवकी तळेकर, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख – सूर्यकांत भालेकर, दळवी कॉलेजचे विद्यार्थी, विद्यालयाचे एन. सी. सी. विभागाचे विद्यार्थी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स