पालकमंत्री नितेश राणे यांनी संदेश पारकर कुटुंबियांची भेट घेऊन केले सांत्वन.
कणकवली | ब्यूरो न्यूज : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यामुळे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आज पारकर कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, कार्यकर्ते संजय मालंडकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)