ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांधकाम कामगार महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी कामगार नेते हरी चव्हाण यांची फेरनिवड.

बांधकाम कामगार महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी कामगार नेते हरी चव्हाण यांची फेरनिवड.

प्रकाशन: 19 May 2025 06:37 PM
वाचन संख्या 58

कणकवलीत संपन्न झालेल्या चौथ्या त्रैवार्षिक अधिवेशनात कार्यकारिणीची निवड.

मालवण | ब्यूरो न्यूज : भारतीय मजदूर संघ या अखिल भारतीय कामगार संघटनेस संलग्न असलेल्या बांधकाम कामगार महासंघाच्या प्रदेश अध्यक्षपदी मालवणचे कामगार नेते हरी चव्हाण यांची फेरनिवड झाली आहे.

बांधकाम कामगार महासंघाचे ४ थे त्रैवार्षिक प्रदेश अधिवेशन दिनांक १८ मे २०२५ रोजी कणकवली येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान सभागृहात संपन्न झाले. या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश अध्यक्ष ॲड. अनिल ढुमणे, प्रदेश महामंत्री किरण मिलगीर, केंद्रीय पदाधिकारी सुरेश शेलार, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, महासंघाचे सरचिटणीस संजय सुरोशे, महासंघाचे जिल्हाध्यक्ष भगवान साटम, मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष सत्यविजय जाधव आदी उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी नितेश राणे यांनी मी तुमचा हक्काचा माणूस आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटीबद्ध आहे. ही माझ्या परीवारातील संघटना आहे. ती मजबूत करण्यासाठी व प्रत्येक कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्या पाठीशी ठाम उभा राहील अशी ग्वाही दिली.

या अधिवेशनात आगामी तीन वर्षाच्या कालावधीसाठी नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली. यामध्ये बांधकाम कामगार महासंघाच्या प्रदेश अध्यक्ष पदी हरी चव्हाण यांची फेर निवड करण्यात आली तर प्रदेश सरचिटणीस म्हणून रवींद्र माने- सातारा यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी विकास सुतार – रायगड, सुरेश कोंडके – छत्रपती संभाजीनगर, बाळासाहेब पांचाळ – हिंगोली, वंदना तावडे – सिंधुदुर्ग, सुनील कोळी जळगाव, रेश्मा शीलवंत – सातारा, चिटणीस म्हणून हेमंतकुमार परब सिंधुदुर्ग, प्रशांत कांबळे – कोल्हापूर, राहुल बोडके – पुणे, लहूराज शिंगाडे – सातारा, संतोष लाड रत्नागिरी, किरण काकडे – धुळे, कोषाध्यक्ष म्हणून बाळकृष्ण कांबळे – ठाणे, संघटनमंत्री म्हणून संजय सुरोशे नांदेड, कार्यकारणी सदस्य म्हणून जयवंत शेटे – सातारा, भास्कर गव्हाणे – ठाणे, पवन खूपसे – नांदेड, यांची एक मताने निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन असंघटित क्षेत्र सहप्रभारी श्रीपाद कुटासकर यांनी केले. या अधिवेशनास महाराष्ट्रातील १४ जिल्हांमधून १ हजार पेक्षा जास्त बांधकाम कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

हे त्रैवार्षिक अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सचिव प्रवीण जाधव, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी अशोक घाडीगावकर, राजेंद्र आरेकर, ओमकार गुरव, दत्ताराम घाडीगांवकर, विकास गुरव, सुधीर ठाकूर, संतोष परब, सुनिता ताटे, वृषाली बागवे, प्राची परब, वंदना तावडे, अखिल गुरव, अशोक राऊळ, सुधीर भरडे, ज्ञानदेव भोगले, सुधीर वायंगणकर, दिनेश घाडी, सूर्यकांत कुडतरकर, दिनेश तेली, बबन डोईफोडे, घाडी आदी व अन्य कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 282

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स