ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते कणकवली नगरपंचायत आयोजित दिवाळी बाजाराचा उद्या शुभारंभ.

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते कणकवली नगरपंचायत आयोजित दिवाळी बाजाराचा उद्या शुभारंभ.

प्रकाशन: 27 Oct 2021 08:43 PM
वाचन संख्या 45

28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता उपस्थित राहण्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन

कणकवली | उमेश परब : स्थानिक व्यवसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने कणकवली नगरपंचायत व युथ वेल्फेअर असोसिएशन च्या माध्यमातून कणकवली पेट्रोल पंपाच्या समोरील फ्लाय ओव्हर ब्रिज खाली आयोजित करण्यात आलेल्या कणकवली नगरपंचायत दिवाळी बाजार चे उद्घाटन उद्या 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता माजी खासदार व भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या दिवाळी बाजाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे दिवाळीनिमित्त घरोघरी लावण्यात येणारे आकाश कंदील हे कणकवलीतील कुंभार बांधवांनी मातीच्या सहायाने बनविलेले असणार आहेत. तसेच घरगुती बनविलेले अन्य आकाश कंदील देखील येथे उपलब्ध असणार आहेत. तसेच या ठिकाणी कुंभार बांधवाकडून मातीद्वारे बनविण्यात येणाऱ्या विविध वस्तू लाईव्ह पहाता येणार आहेत. तर कणकवली शहरातील बचत गटांच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या दिवाळीच्या फराळाच्या अनेक घरगुती वस्तू देखील या दिवाळी बाजारात एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या दिवाळी बाजाराच्या उद्घाटन प्रसंगी कणकवली नगरपंचायत चे सर्व पदाधिकारी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स