ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र 'जीवन शिक्षण' मध्ये शुभांगी लोकरे-खोत यांचा लेख प्रकाशित.

शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र 'जीवन शिक्षण' मध्ये शुभांगी लोकरे-खोत यांचा लेख प्रकाशित.

प्रकाशन: 18 May 2025 08:22 PM
वाचन संख्या 57

१६० वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या मासिकात लेख प्रसिद्धी अभिमानास्पद.

मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र असलेल्या आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत प्रकाशित होणाऱ्या ‘जीवन शिक्षण’ या मासिकात जिल्हा परिषद शाळा चिंदर सडेवाडी, मालवण येथे कार्यरत असणाऱ्या नवनियुक्त शिक्षिका तथा प्रभारी मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे-खोत यांचा ‘परिवर्तनशील अध्ययन निष्पती : एनसीएफ २०२० चा शालेय शिक्षणावरील परिणाम’ हा इंग्लिश भाषेतील लेख प्रकाशित झाला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट् पुणे-३० यांच्या मार्फत जीवन शिक्षण हे मासिक प्रकाशित केले जाते, या मासिकाला १६० पेक्षा अधिक वर्षाची गौरवशाली परंपरा लाभली आहे. प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावणारे हे मासिक शालेय शिक्षण विभागाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाते. जीवन शिक्षण” हे महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचे मासिक आहे. त्यात शिक्षिका शुभांगी लोकर-खोत यांचा प्रसिद्ध झालेला लेख निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.

प्रकाशित झालेल्या लेखातून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील शालेय अभ्यासक्रमात महत्वाची भूमिका बजावतात त्या अध्ययन निष्पती आणि याच अध्ययन निष्पतीची माहिती देणारा परिवर्तनशील अध्ययन निष्पती : एनसीएफ २०२० चा शालेय शिक्षणावरील परिणाम हा लेख Transforming Lo’s (Learning Outcomes ):The impact of NCF 2020 on School Education या मथळ्याखाली इंग्लिश मध्ये प्रकाशित झाला आहे.

अशा आशयाचे लेखन सौ. शुभांगी लोकरे खोत यांच्या प्रकाशित लेखात करण्यात आले आहे. अशा प्रकारचे संशोधनात्मक लेखन करणे आणि त्याची महाराष्ट्र शासनाच्या मासिकातुन दखल घेतली जाणे ही कौतुकास्पद बाब आहे. जिल्हा परिषद शाळा चिंदर सडेवाडी प्रशालेत कार्यरत असलेल्या शुभांगी खोत यांनी यापूर्वी सीबीएसई स्कुल मध्ये प्रिंसिपल पदाची जबाबदारी ही यशस्वी पार पाडली आहे. तसेच इंग्लिश कम्युनिकेशन यात त्या पीएचडी करत आहेत. असे सांगत प्राधापक नागेश कदम तसेच अनेक शिक्षकांकडून शुभांगी लोकरे-खोत विशेष कौतुक करण्यात आले. वरिष्ठ अधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा डायटचे प्राचार्य राजेंद्र कांबळे, गटशिक्षणाधिकारी संजय माने, विस्तार अधिकारी उदय दिक्षित, प्रा. नागेश कदम, नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभले असे शुभांगी लोकरे-खोत यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स