ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीत गावठी आठवडा बाजार पुन्हा सुरू होणार

कणकवलीत गावठी आठवडा बाजार पुन्हा सुरू होणार

प्रकाशन: 27 Oct 2021 06:00 PM
वाचन संख्या 60

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार शुभारंभ

कणकवली | उमेश परब (ब्युरो चीफ, सिंधुदुर्ग) : केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून व पं स कणकवलीच्या पुढाकाराने व स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विदयमाने २६ जानेवारी २०१७ रोजी जिल्ह्यातील पहिला गावठी आठवडा बाजार कणकवली येथे सुरू करण्यात आला.सदरचा बाजार आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी भरवण्यात येत होता. त्याला प्रचंड प्रतिसाद स्थानिक शेतकऱ्यांकडुन लाभला. परंतू कोरोनाच्या पाश्वभूमिवर सदरचा आठवडा बाजार काही काळा साठी बंद करण्यात आला होता.आता कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्याने कोरोनाचे सर्व नियम पाळून पुन्हा एकदा शुक्रवार २९ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती सभापती मनोज रावराणे यांनी दिली. तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला गावठी माल स्थानिक पातळीवर विक्रीसाठी नेऊन त्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी.तसेच सर्वसामान्य जनतेला ही आरोग्या च्या दृष्टीने नैसर्गिक खतावर बनलेली पौष्टिक भाजी, फळे सहज रित्या योग्य दारात उपलब्ध व्हावी व शेतकऱ्याचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा या हेतूने सदरचा गावठी आठवडा बाजार पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय पं.स कणकवली व स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग च्या सयूंक्त विद्यमाने घेण्यात आलेला आहे. या साठी नारायण राणे तसेच आमदार नितेश राणे यांचे योगदान मोलाचे आहे.त्यांच्या प्रेरणेतूनच पुन्हा एकदा नव्या उमेदीने हा गावठी आठवडा बाजार आम्ही सुरू करीत आहोत. त्याचे उदघाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते व जि.प अधक्ष सौ.संजना सावंत यांच्या उपस्थितीत शुक्रवार २९ऑक्टोबर रोजी १०वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे होणार आहे.सदरचा गावठी आठवडा बाजार पूर्वी प्रमाणे दर शुक्रवारी हायवे नजीक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भरवला जाणार आहे.तरी ज्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गावठी आठवडा बाजारात आपला स्थानिक गावठी माल विक्रीसाठी अनावयाचा असेल त्यांनी आपला माल घेवून शुक्रवार २९ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 पासून पुढे दर शुक्रवारी कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थिती राहावे.तसेच तालुका व जिल्ह्यातील सर्व जनतेने कोरोनाच्या नियम व अटींचे पालन करून याचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती मनोज रावराणे,उपसभापती प्रकाश पारकर ,गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, प.स.कणकवली व स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स