महिला खुला गट साॅफ्टबॉल राज्य स्पर्धा जिल्हा निवड चाचणी.
अजय शिंदे यांची माहिती.
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन आयोजित साल २०२४ – २०२५ साठीच्या वरिष्ठ गट महिला राज्य सॉफ्टबॉल अजिंक्य पद स्पर्धा या स्पर्धा २० मे ते २२ मे या कालावधीत पलूस येथील ‘पलूस शिक्षण प्रसारक मंडळ, सांगली’ येथे खेळवल्या जात आहेत. यंदा या स्पर्धेचे हे ३० वे वर्ष आहे. सांगली जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन सांगली यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी सॉफ्टबॉल असोसिएशनचा सिंधुदुर्ग जिल्हा महिला वरिष्ठ संघ सहभागी होणार आहे. या वरिष्ठ संघाची निवड करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी सॉफ्टबॉल असोसिएशन मालवण यांच्यावतीने श्री सद्गुरू सदानंद माऊली एज्युकेशन फाउंडेशन संचलित डॉक्टर श्री सी कुडाळकर हायस्कूल मालवण वायरी या ठिकाणी शनिवार दिनांक १७ मे रोजी, सायंकाळी चार वाजता निवड चाचणीचे आयोजन केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सॉफ्टबॉल वरिष्ठ गट महिलांना या राज्य स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी डॉक्टर श्री. सी. कुडाळकर हायस्कूल वायरी, मालवण या ठिकाणी नमूद केलेल्या वेळेत हजर राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष श्री. सकपाळ यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव श्री. अजय शिंदे 9422394186 यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)