ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
शिवराज भूषण नाट्याचा शुभारंभ.

शिवराज भूषण नाट्याचा शुभारंभ.

प्रकाशन: 01 May 2025 01:10 PM
वाचन संख्या 70

मालवण | प्रतिनिधी : शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या ३५१ व्या वर्धापन दिनानिमित्त ६ जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त श्री शिवराज मंच मालवण यांच्यावतीने ‘शिवराज भूषण’ हे ऐतिहासिक नाट्य साकारले जाणार आहे. या नाट्याचा तालीम शुभारंभ अक्षय तृतीया शुभ मुहूर्तावर मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच श्रीफळ ठेवून मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, अभिनेते अभय खडपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या नाटकाची संकल्पना आणि निर्मिती उद्योजक तथा शिवप्रेमी भूषण साटम यांची असून दिग्दर्शन गणेश मेस्त्री यांचे आहे. या नाटकाचे प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर करण्यात येणार आहेत, अशी माहिती शिवराज मंच तर्फे देण्यात आली आहे. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी विशेष मनोगत व्यक्त केले.

नाटकाचे निर्माते भूषण साटम यांनी प्रास्ताविक करत नाटक सादरीकरणामागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर कवी भूषण यांचा ब्रज भाषेतील छंदाचे त्यांनी सादरीकरण केले.

या प्रसंगी श्री. प्रकाश कुशे, उद्योजक भूषण साटम, संजय शिंदे, भाऊ सामंत, उद्योजक तथा शिवभक्त संजय गावडे, गणेश मेस्त्री, बबन परुळेकर, शुभदा टिकम, पूजा सरकारे, समीर शिंदे, गजानन मांजरेकर, सुभाष कुमठेकर, रोहित परुळेकर, परुळेकर यांसह अन्य कलावंत उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स