ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मालवण तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर.

मालवण तालुका पत्रकार संघ अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर.

प्रकाशन: 23 Apr 2025 08:39 PM
वाचन संख्या 109

सचिवपदी कृष्णा ढोलम आणि उपाध्यक्ष पदी विशाल वाईरकर व परेश सावंत तर खजिनदार पदी संदीप बोडवे व सहसचिवपदी गावडे.

मावळते अध्यक्ष संतोष गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुका पत्रकार समिती अध्यक्षपदी दत्तप्रसाद पेडणेकर तर सचिव पदी कृष्णा ढोलम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी विशाल वाईरकर व परेश सावंत, खजिनदारपदी संदीप बोडवे तर सहसचिवपदी गावडे यांसह कार्यकारणी सदस्य यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मालवण शासकीय विश्रामगृह सिंधुरत्न सभागृह येथे, जिल्हा पत्रकार संघ निरीक्षक किशोर जैतापकर, प्रशांत वाडेकर यांसह जिल्हा पत्रकार संघ उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर, मालवण तालुका पत्रकार समितीचे पालक तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य अमित खोत, तालुका पत्रकार संघांचे मावळते अध्यक्ष संतोष गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड प्रक्रिया संपन्न झाली.

मालवण तालुका पत्रकार संघ कार्यकारणी सदस्यपदी संतोष हिवाळेकर, विकास गांवकर, भूषण मेतर, संग्राम कासले, उदय बापार्डेकर, आप्पा मालंडकर, राजेश पारधी यांसह पदसिद्ध सदस्य म्हणून जिल्हा उपाध्यक्ष विद्याधर केनवडेकर आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य अमित खोत यांची निवड निश्चित करण्यात आली.

यावेळी मालवण पत्रकार समितीचे जेष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, राजा खंडाळेकर, प्रफुल्ल देसाई, विवेक नेवाळकर, डि. टी. मेथर यांसह मनोज चव्हाण, महेश सरनाईक, सिद्धेश आचरेकर, समीर म्हाडगुत, प्रशांत हिंदळेकर, सौगंध बादेकर, गणेश गांवकर, अनिल तोंडवळकर, सुरेश घाडीगावकर, सुधीर पडेलकर, भाऊ भोगले, झुंजार पेडणेकर, शैलेश मसुरकर, अमोल गोसावी, आचरेकर संतोष अपराज आदी पत्रकार उपस्थित होते.

सौजन्य : मालवण ब्यूरो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स