साळशीत गुरांना होणार्या घटसर्प रोगप्रतिबंधक लसीकरणाचे प्रात्यक्षिक..!
शिरगांव | संतोष साळसकर : विद्यार्थी ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेंतर्गत गुरांना होणाऱ्या घटसर्प या रोगाचे लसीकरणाचे प्रात्यक्षिक डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे शिक्षण घेणाऱ्या कृषी कन्या प्रतिक्षा पोईपकर यांनी देवगड तालुक्यातील साळशी येथील शेतकऱ्यांना दाखविले. यावेळी त्यांनी गुरांना होणाऱ्या घटसर्प या रोगाविषयी मार्गदर्शन केले. त्याची लक्षणे व त्यावरील उपचार सांगितले. यावेळी२०-२५ गुरांना घटसर्प या रोगावर रोग प्रतिबंध लसीकरणाचे प्रात्यक्षिक दाखविले. तसेच शिरगाव पशुवैद्यकीय दवाखान्या मार्फत जंतनाशक औषध व क्षार चुर्ण पावडरचे वाटप करण्यात आले. तसेच कोबंडी पक्षीसाठी रानीखेत(मानमोडी) रोगप्रतिबंध लसीकरण करण्यात आले. यावेळी शिरगाव पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन पर्यवेक्षक डॉ के बी राणे, साळशी सरपंच वैभव साळसकर, कृषी कन्या प्रतिक्षा पोईपकर, पशुधन परिचर ए एस गौते योगेश मिराशी, प्रकाश पोईपकर, पांडुरंग मिराशी, आदी शेतकरी उपस्थित होते. .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)