ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वृद्धेच्या घरचा वीज कनेक्शनचा तांत्रिक लपंडाव, राजकारण्यांनी घेतली मदतीसाठी विजयी धाव..!

वृद्धेच्या घरचा वीज कनेक्शनचा तांत्रिक लपंडाव, राजकारण्यांनी घेतली मदतीसाठी विजयी धाव..!

प्रकाशन: 27 Oct 2021 10:13 AM
वाचन संख्या 82

चिंदर | विवेक परब : नविन वीज जोडणीसाठी नातेवाईकाच्या थकबाकीसाठी महिलेला धरले वेठीस धरण्याचा एक प्रकार आचरा येथे घडला आहे.
आचरा येथे नव्या घराच्या वीजमिटरच्या जोडणीची मागणी करून गेले आठ महिने आचरा वीजवितरणच्या कार्यालयात खेटे घालणार्या जेष्ठ वयोवृध्द महिलेला वीज कनेक्शन न मिळाल्याने हतबल होऊन तिला कनेक्शनसाठी दिवसभर विजवितरणच्या कार्यालयाच्याबाहेर बसून राहणयाची वेळ आल्याची घटना सोमवारी घडली. चिंदर सडेवाडी येथील एका ज्येष्ठ महिलेला आचरा वीजवितरण कार्यालयाकडून सुमारे २० वीस वर्षांपूर्वी मयत झालेल्या नातेवाईकाची असलेली वीजबिलाची थकबाकीचे कारण देत वीजमीटर जोडणी नाकारली जात होती. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत हि वयोवृध्द महिला बसून असल्याचे समजताच चिंदर गावचे धोंडी चिंदरकर व उपसरपंच दिपक सुर्वे व इतर ग्रामस्थांनी बीजवितरणला धडक देत महिलेला वीजजोडणी का केली जात नसल्याचे विचारत वीज अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी २० वर्षांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीच्या नावाने एका इसमाने अर्ज करून सदर थकबाकीचा मिटर या वृध्द महिलेच्या नावे करण्याचा मागणीअर्ज केल्याचा प्रकार समोर आला असून त्यानुसार वीजवितरणने तो मीटर त्या महिलेच्या नावे केल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. हा प्रकार चिंदरकर यांनी उघड करताच नियमांवर बोट ठेवून बोलणाच्या वीज अधिका-यांनी मीटर जोडणी देण्याचे कबूल केले.थकबाकीच्या वीजमिटरशी कोणताही संबंध नसताना या प्रकाराने ज्येष्ठ वृध्द महिला हवालदिल झाली होती. चिंदर सडेवाडी येथील लक्ष्मी शरद मुंबरकर या पासष्ट वर्षाच्या महिलेने आपला घरक्रमांक १०३४ या नव्या घरासाठी आचरा वीजवितरण कार्यालयाकडे मिटर जोडणी देण्यासाठी रितसर अर्ज करत मागणी केली होती. या ज्येष्ठ महिलेला गेले आठ महिने यासाठी विजवीतरणकडे चकरा माराव्या लागत होत्या .तिला नेहमी आपल्या नातेवाईकाच्या घराचे बीजबील थकित असल्याचे सागूंन माघारी पाठवले जात होते. वीज कनेक्शनसाठी सदर महिला सोमवारीही अशीच विजवितरण कार्यालयात गेली असता वीजअधिकारी सरमळे यांनीही तीला तेच कारण देत माघारी जाण्यास सांगितले तेंव्हा मात्र व्यस्थित झालेल्या महिलेने शेवटी जोपर्यंत कनेक्शन मिळत नाही तोपर्यंत कार्यालया बाहेरून न हलण्याचा निर्णय घेतला . वीज जोडणीच्या मागणीसाठी चिंदर गावातील वृध्द महिला कार्यालयाबाहेर दिवस भर बसून होती. अखेर राजकीय व्यक्तिंनाच येऊन खरी परिस्थिती प्रकाशात आणत ज्येष्ठ महिलेच्या घरचा वीज कनेक्शनाच्या लपंडावाचा खेळ नियंत्रीत करावा लागला अशीच चर्चा आचरा व चिंदर परिसरात आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स