वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर.
कुडाळ | प्रतिनिधी : माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ रोजी भव्य रक्तदान शिबिर आयोजीत करण्यात आले आहे. शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
म्हाडगुत काॅम्प्लेक्स, बाजार येथे २६ मार्च रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे. प्रत्येक रक्तदात्याला भेटवस्तू देण्यात येणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)