आमदार निलेश राणे यांनी घेतली कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त देण्यासोबत बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर चर्चा.
ब्यूरो न्यूज : कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची २४ मार्च रोजी भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त देण्यासंदर्भात चर्चा झाली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठी असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त नसून अजूनही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकच सहाय्यक कामगार आयुक्त आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, प्रश्न प्रलंबित राहतात यात कामगारांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी आमदार निलेश राणे यांनी कामगार मंत्री श्री. फुंडकर यांची भेट घेऊन चर्चा केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)