ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
हडपिड स्वामी समर्थ मठ येथे ३१ मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

हडपिड स्वामी समर्थ मठ येथे ३१ मार्च रोजी स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा.

प्रकाशन: 22 Mar 2025 07:47 PM
वाचन संख्या 216

मसुरे | प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड या मठाचा सहावा वर्धापन दिन सोहळा, तसेच अक्कलकोट निवास श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा ३१ मार्च रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त ३० व ३१ मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दिनांक ३१ मार्च रोजी पुणे जेजुरी गड कडेपठारावरील श्री देव मल्हारी मार्तंड यांच्या येळकोट येळकोट जय मल्हार देखाव्याचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ मालिका फेम श्री स्वामींची भूमिका साकारलेले अभिनेते श्री अक्षय मुडावदकर यांच्या हस्ते सकाळी ९:३० वाजता होणार आहे. यानिमित्त होणारे कार्यक्रम ३० मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता शिरगाव पावणादेवी मंदिर ते श्री स्वामी समर्थ मठ हडपिड पर्यंत पालखी मिरवणूक, सायंकाळी ७ वाजता पुणे जेजुरी गड, कडेपटारावरील श्री देव मल्हारी मार्तंड यांच्या सत्वांचे आगमन. ३१ मार्च रोजी सकाळी सकाळी ५ ते ९ वाजता या कालावधीत श्री गणेश पूजन, पादुकापूजन, अभिषेक, होमहवन, श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी ९:३० वाजता मल्हारी मार्तंड यांच्या देखाव्याचे अक्षय मुडावदकर यांच्या हस्ते उद्घाटन, सकाळी १० वाजता लघुरुद्र कुंकूमार्चन, दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा सोहळा, दुपारी १२:३० वाजता महाआरती, दुपारी १ ते २:३० महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता गोंधळ, सायंकाळी ६ वाजता सुस्वर भजने, सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसाद, रात्री १० वाजता तुफानी विनोदी लोकनाट्य कोकणचा साज संगमेश्वरी बाज आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व भाविकांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडच्या वतीने अध्यक्ष श्री. प्रभाकर राणे, सचिव अक्कलकोट भूषण स्वामीरत्न पुरस्कार सन्मानित श्री नंदकुमार पेडणेकर व विश्वस्त खजिनदार श्री ज्ञानेश्वर राऊत यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स