ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
साॅफ्टलॅब गृप मालवण कार्यालयास मेट्रोपाॅलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालाॅजी ॲन्ड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची भेट.

साॅफ्टलॅब गृप मालवण कार्यालयास मेट्रोपाॅलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालाॅजी ॲन्ड मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांची भेट.

प्रकाशन: 22 Mar 2025 07:01 PM
वाचन संख्या 182

मालवण : सॉफ्टलॅब्स गृपच्या मालवण कार्यालयास मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट येथील ४९ विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीसाठी भेट दिली. यावेळी सहाय्यक प्राध्यापक सुदेश जामसंडेकर आणि मृणाली कुडतरकर उपस्थित होते.

यावेळी मालवण टीमच्या वरिष्ठ सदस्यांनी सॉफ्टलॅब्स ग्रुप च्या सेवांची माहिती देताना, आयटी उद्योगातील अनुकूलता आणि आय टी क्षेत्रातील शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केले. यावेळी भेट देणारे विद्यार्थी आणि साॅफ्टलॅब गृप मालवणचे सध्याचे इंटर्न्स यांनी संवाद साधला व अनुभवांची देवाण घेवाण करताना इंटर्न्सनी सॉफ्टलॅब्समधील कार्यकाळात त्यांना मिळालेल्या व्यावसायिक मार्गदर्शनावर प्रकाश टाकला.

यावेळी भेट दिलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने उपप्राचार्य पूनम कदम, सॉफ्टलॅब्स मालवण टीम तसेच सॉफ्टलॅब्स ग्रुपचे सीईओ श्री. मिथिलेश बांदिवडेकर यांचे विशेष आभार मानले. ज्यांच्या दृष्टिकोनामुळे मालवणमधील होतकरू मुलांना तसेच भावी पिढी जी आय टी क्षेत्रामध्ये भविष्य घडवू पाहत आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय ग्राहकांबरोबर कशा प्रकारे काम केले जाते आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजे याचे सखोल मार्गदर्शन मिळाले असेही त्यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स