ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
विष्णू उर्फ दादू रेवंडकर यांना क्रिकेट तपस्वी पुरस्कार.

विष्णू उर्फ दादू रेवंडकर यांना क्रिकेट तपस्वी पुरस्कार.

प्रकाशन: 14 Mar 2025 10:43 PM
वाचन संख्या 332

तारकर्ली क्रिकेट क्लबच्या वतीने ग्रामीण क्रिकेटच्या उन्नतीसाठी योगदान दिलेल्यांसाठीचा विशेष पुरस्कार.

मालवण | ब्यूरो न्यूज : देवबाग गावचे सुपुत्र श्री. विष्णू उर्फ दादा रेवंडकर यांना तारकर्ली क्रिकेट क्लबचा ‘क्रिकेट तपस्वी’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण क्रिकेटच्या उन्नतीसाठी तन, मन, धन अर्पिणाऱ्या व्यक्तीसाठी तारकर्ली क्रिकेट क्लबने कै. गोपाळकृष्ण केळूसकर यांच्या स्मरणार्थ हा जाहीर केला.

दादू रेवंडकर यांचे श्री. स्पोर्ट्स देवबाग या संघाच्या बांधणी मध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांच्या तालमीत दर्शन बांदेकर, नितीन बांदेकर, उमेश येरागी, हेमंत राऊळ, सचिन धुरी, रोशन धुरी, संतोष कुमठेकर आणि यांच्या सारखे अनेक गुणवान खेळाडू तयार झाले आहेत.

या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी देवबाग आणि तारकर्ली गावातील माजी खेळाडूंचा प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता. शाल, श्रीफळ, रक्कम आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप असणाऱ्या या पुरस्काराचे कै. गोपाळकृष्ण केळूसकर यांचे चिरंजीव श्री. चंद्रशेखर गोपाळकृष्ण केळूसकर आणि त्यांच्या पत्नी सौ. तनुजा चंद्रशेखर केळूसकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स