ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मसुरे डांगमोडे येथे ८ मार्च रोजी जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा.

मसुरे डांगमोडे येथे ८ मार्च रोजी जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा.

प्रकाशन: 07 Mar 2025 03:29 PM
वाचन संख्या 67

मसुरे | प्रतिनिधी : नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे यांच्या आयोजनाखाली आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडेशन व मालवण तालुका कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मसुरे डांगमोडे, रवळनाथ मंदिर येथे श्री भवानी मातेच्या वार्षिक गोंधळ उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वरिष्ठ गट पुरुष / महिला जिल्हा अजिंक्याद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमधून निवडलेले पुरुष / महिला संघ ठाणे येथे दिनांक १९ ते २३ मार्च या कालावधीत आयोजित होणाऱ्या ७१ व्या वरीष्ठ गट पुरुष / महिला अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत .

जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत विजेत्या पुरुष व महिला या दोन्ही गटासाठी प्रथम क्रमांक ७०००/_ व चषक, द्वितीय क्रमांक ५०००/_ व चषक, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड व अष्टपैलू खेळाडूंना प्रत्येकी ५००/_ रुपये व चषक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील सर्व चषक कै. शिवाजी गंगाराम ठाकूर यांच्या स्मरणार्थ पुरस्कृत करण्यात आले आहेत. स्पर्धेदरम्यान सर्व खेळाडू आणि सहभागी कबड्डी हितचिंतक यांची मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या शुभहस्ते होणार सायंकाळी ६ वाजता होणार असून यावेळी मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना नेते संजय आंग्रे, नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे चे सर्व पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संघ निश्चिती व अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे सहकार्यवाह श्री नितीन हडकर ( मोबाईल क्र. : 7249357239) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन स्पर्धा संयोजन समितीने केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स