कणकवली येथे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीची भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात.
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ पुरस्कृत, तालुका माध्यमिक अध्यापक संघ आयोजित क्रिडा उपक्रम.
ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येथील एस. एम. हायस्कूल, प्रशालेच्या मैदानावर सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ पुरस्कृत, तालुका माध्यमिक अध्यापक संघ आयोजित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीची जिल्हास्तरीय भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यामध्ये जिल्ह्यातील १४ संघांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये शिक्षण संस्था चे सचिव डी. एम. नलावडे, कोकण विभाग लोकशाही आघाडी अध्यक्ष सागर पाटील, जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे, जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे सचिव विजय मयेकर, जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे अध्यक्ष सुरेंद्र लांबोरे, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब उपाध्यक्ष संदीप कदम, सचिन मिरगल रत्नागिरी संपर्क प्रमुख, एस एम मुख्याध्यापक जी एन बोडके, उपमुख्याध्यापक रवी प्रधान, जिल्हा पतपेढी संचालक मारुती पुजारी, शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष कमलेश गोसावी, कास्ट्राईब जिल्हा अध्यक्ष संजय पेंडुरकर, सचिव अभिजीत सावंत, कोल्हापूर विभागीय क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ उपाध्यक्ष मारुती माने , सौ. श्रद्धा कदम, श्री पी. व्ही. कांबळे, नारायण माने, माधव यादव, शिवराम सावंत, भाऊसाहेब चवरे, विश्वनाथ सावंत, अजय सावंत, प्रशांत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण संस्था चे सचिव डी. एम. नलावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. कोकण विभाग लोकशाही आघाडी अध्यक्ष सागर पाटील यांनी मनोगताद्वारे खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेची सुरुवात महिलांच्या प्रदर्शनीय सामन्याने झाली. मालवण तालुका महिला संघ व विद्यामंदिर हायस्कूल, महिला संघ यांच्यामध्ये सामना झाला. महिलांच्या दोन्ही संघांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
पुरुषांचा अंतिम सामना तुळसुली हायस्कूल, कुडाळ व साळगाव हायस्कूल, कुडाळ यांच्यामध्ये झाला. यामध्ये स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तुळसुली हायस्कूल कुडाळ, द्वितीय क्रमांक साळगाव हायस्कूल, कुडाळ तर तृतीय क्रमांक एस. एम. हायस्कूल, यांनी प्राप्त केला. विजेत्या संघाला रोख ४४४४/- व आकर्षक चषक , द्वितीय क्रमांकाच्या संघाला रोख ३३३३/ व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
बेस्ट लिप्टर सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ परिवार आयोजित जिल्हा स्तरिय स्काॅलरशिप सराव परिक्षेतील तालुका यशस्वी प्रथम तिनं क्रमांकांचे चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले
स्पर्धेचे नियोजन तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष एम. एच. पुजारी व सहकार्यांनी केले होते. त्यांना एस. एम. प्रशाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन एस. एम. पवार, सहाय्यक शिक्षक एस. एम. हायस्कूल, यांनी केले तर आभार जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे सचिव विजय मयेकर यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)