महाशिवरात्री निमित्त वैभव नाईक यांचे श्री क्षेत्र कुणकेश्वर दर्शन.
मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व सहकारी उपस्थित.
ब्यूरो न्यूज : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून श्री देव कुणकेश्वराचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी कुणकेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व मंदिराची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरसकर, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे, अक्षय भोसले यांसह कुणकेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)