ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत.

प्रकाशन: 27 Feb 2025 07:29 AM
वाचन संख्या 140

उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे व आमदार निलेश राणे यांच्या प्रभावशाली नेतृत्वावर विश्वास.

मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. संजय पडते यांसह आजी माजी सरपंच व शेकडो उबाठा कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे यांसह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. कुणकेश्वर यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचे दर्शन घेतले. त्या नंतर परिसरातील एका निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. संजय पडते यांसह गिरगांव कुसगाव सरपंच स्नेहा सावंत, यांसह असंख्य कार्यकर्ते, गोवेरी येथील कार्यकर्ते, माडयाची वाडी, सोनवडे तर्फ तुलासुली, रांजना येथील शेकडो उबाठा कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यांसह मुंबई येथील काँग्रेस पदाधिकारी व मूळ तळाणी अंगणेवाडी येथील सुनील आंगणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी आमदार रवींद्र फाटक, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, संजू परब, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, युवासेना जिल्हा प्रमुख ऋत्विक सामंत, आंनद शिरवलकर, उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, बंटी तुळसकर, अरविंद करलकर, दादा साईल, रत्नाकर जोशी, किसन मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, विनायक राणे, आबा धडाम, हर्षद पारकर, दीपलक्ष्मी पडते, सरोज परब, नगरसेविका चांदणी कांबळी, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, महिला उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, युवतीसेना जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, अंजना सामंत, सिद्धी शिरसाठ, तुळसकर, नाटेकर, सुनील घाडीगावकर, सुशांत घाडीगावकर, मकरंद राणे, छोटू ठाकुर, प्रितम गावडे, दिलीप बिरमोळे, ऋषिकेश सामंत यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले की आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात शिवसेना जोमाने वाढत आहे. विकास कामे गतिमान होत आहेत.

यावेळी संजय पडते म्हणाले, शिवसैनिक शाखाप्रमुख म्हणून नारायण राणे साहेबांच्या नेतृत्वात काम केले. त्यांचा भक्कम पाठिंबा मिळाला. मात्र काही गैरसमजातून दहा वर्षा पूर्वी बाजूला गेलो. मात्र आता पुन्हा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. अनेक पदाधिकारी आजी माजी शिवसैनिक शेकडो कार्यकर्ते सोबत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 9
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 317

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स