लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने आरोग्य शिबीर.
मालवण | ब्यूरो न्यूज :
लायन्स क्लब मालवणच्या वतीने आयोजित आणि पुणे येथील उद्योजक सागर वाडकर यांच्यातर्फे पुरस्कृत मधुमेह तपासणी व औषध वाटप शिबीर आज आणि उद्या दि. २५ व २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत मालवण येथील दैवज्ञ भवन येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात पुणे येथील डॉ. ए. एच. इनामदार हे तपासणी करणार आहेत. सदर शिबिराला प्रथम येणाऱ्या २५ गरजूना मोफत औषधे दिली जातील. गरजू व्यक्तींनी नाव नोंदणीसाठी सौ. पल्लवी तारी – खानोलकर 9011056317, गणेश प्रभुलीकर- 9422584649, फॅनी फर्नांडिस 7066737436 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लायन्स क्लब मालवणच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)