ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आ. निलेश राणेंचे पत्र ;     परप्रांतीय भंगार व्यवसायिकांचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाकडून जमीनदोस्त.

आ. निलेश राणेंचे पत्र ; परप्रांतीय भंगार व्यवसायिकांचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाकडून जमीनदोस्त.

प्रकाशन: 24 Feb 2025 02:40 PM
वाचन संख्या 342

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी मालवण आडवण येथील परप्रांतीय भंगार व्यवसायिकांची अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी पत्र दिले. त्यानंतर प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने ती जमीनदोस्त केली. याला नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत कारवाईचे स्वागत केले आहे.

मालवण नगरपरिषद हद्दीतील वायरी आडवण येथे काही परप्रांतीय भंगार व्यवसायिक यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केले असून येथे अनेक गैरप्रकार सुरु आहेत, तरी सदरील अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा करावा असे निवेदन पत्र आमदार निलेश राणे यांच्या वतीने नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनास दिले होते. त्यानुसार तात्काळ कारवाई झाली आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाऊ सामंत, आनंद शिरवलकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, राजन वराडकर, महेश सारंग, राकेश सावंत, ललित चव्हाण, निषय पालेकर, उमेश मांजरेकर यांसह शेकडो नागरिक उपस्थित होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरु असताना मालवण शहरात आडवण परिसरात मात्र परप्रांतीय भंगार व्यासायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला. याबाबत हिंदू समाज संतप्त बनला आहे. दत्ता सामंत म्हणाले अशा प्रकारे जर कोणी देशद्रोही भुमिका घेत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे यांसह महायुती नेते यांच्या नेतृत्वात आक्रमक भुमिका घेऊ, अनधिकृत सर्व बांधकामे तात्काळ हटवा भुमिका राहणार असल्याचे दत्ता सामंत म्हणाले. तसेच देशविरोधी भुमिका घेणाऱ्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे असेही सामंत म्हणाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स