ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू.

दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू.

प्रकाशन: 22 Feb 2025 04:48 PM
वाचन संख्या 213

तारकर्ली समुद्रातील दुर्घटना.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेले हडपसर – पुणे येथील ५ पर्यटक समुद्रात बुडाले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे . उर्वरित ३ पर्यटकांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे . ही घटना दुपारी ११ .२० वाजण्याच्या सुमारास घडली . रोहित बाळासाहेब कोळी (वय २१) रा – हडपसर , पुणे , शुभम सुनील सोनवणे (वय २२ हडपसर, पुणे) या दोन युवकांचा मृत्यू झाला. दोन्ही पर्यटकांचे मृतदेह स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले.

कुश संतोष गदरे ( २१ रा हडपसर पुणे ) , रोहन रामदास डोंबाळे( २० हडपसर पुणे ) ओंकार अशोक भोसले (वय २४, पुणे ) या तीन युवकांना वाचविण्यात यश आले आहे. सकाळच्या सुमारास तारकर्ली पर्यटन विकास महामंडळाच्या नजीक असलेल्या समुद्रकिनारी हे युवक पाण्यात उतरले होते. यावेळी अचानक पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्यामुळे पोहत असलेल्या युवकांपैकी ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे युवक पाण्यात ओढले गेले. किनाऱ्यावरील स्थानिकांनी तसेच पर्यटन व्यवसायिकांनी तात्काळ समुद्राच्या पाण्यात बचाव कार्य सुरू केले. बोटीच्या सहाय्याने बुडालेल्या युवकांचा पाण्यात शोध कार्य सुरू करण्यात आले. अखेर स्थानिकांकडून समुद्राच्या पाण्यात शोधकार्य सुरू असताना बुडालेल्या अवस्थेत तीनही युवक सापडून आले. त्यांना तात्काळ किनाऱ्यावर आणल्यावर रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल करण्या आले. दरम्यान डॉक्टर आणि तपासणी केली असता रोहित कोळी व शुभम सोनवणे यांना मयत घोषित केले. मात्र ओंकार भोसले हा अत्यवस्थ असून त्याच्यावर अधिक उपचार करण्या साठी त्याला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

बचाव कार्यात समीर गोवेकर, वैभव सावंत, दत्तराज चव्हाण, महेंद्र चव्हाण, रांजेश्वर वॉटर स्पोर्ट चे कर्मचारी सामील होते. मालवण पोलिसांच्या वतीवे या घटनेचा तपास सुरू आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स