श्री मनोज मोंडकर व सौ. पूनम चव्हाण यांच्या सहकार्यातून मोफत बससेवा.
श्री भराडी देवी जत्रेस जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष उपक्रमाची ५ वर्षे.
मालवण | प्रतिनिधी : मालवणचे समाजसेवक श्री. मनोज मोंडकर व सौ. पूनम चव्हाण यांच्या सहकार्यातून श्री भराडी देवी यात्रा तथा आंगणेवाडी वार्षिकोत्सव २०२५ साठी जाणाऱ्या प्रभाग क्र. ९ मधील भाविकांसाठी मोफत बससेवेची सोय करण्यात आली. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी तानाजी नाका व आडवण येथील चव्हाण यांचे घर या दोन ठिकाणांहून सकाळी ५ वाजता, ७ वाजता, १० वाजता तसेच दुपारच्या सत्रात १२ वाजता, २ वाजता, ३ वाजता आणि संध्याकाळच्या सत्रात ४ वाजता, ५ वाजता, ६ वाजता व ८ वाजता अशा बसफेऱ्या असा हा विशेष उपक्रम आहे. यंदा या विशेष उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. मनोज मोंडकर, सौ. पूनम चव्हाण, प्रसाद चव्हाण, यशवंत गावकर, मोहन मराळ, भाई लुडबे, खवणेकर, रविना लुडबे, जयु लुडबे उपस्थित होते. मोफत बससेवा उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)