ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शिरवल विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सायबर गुन्हे आणि पोस्को कायदा जनजागृती कार्यक्रम.

शिरवल विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सायबर गुन्हे आणि पोस्को कायदा जनजागृती कार्यक्रम.

प्रकाशन: 14 Feb 2025 11:05 AM
वाचन संख्या 55

कणकवली | ब्यूरो न्यूज : शिरवल येथील विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अँटी – रॅगिंग सेल च्या वतीने पोस्को कायदा, सायबर गुन्हे आणि पीडित भरपाई योजना याविषयी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. अर्चना गवाणकर आणि ॲड. चैताली चेतन मुंज यांनी सायबर गुन्ह्यांपासून बचाव कसा करावा, पीडित व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतूदी, तसेच विद्यार्थ्यांनी जागरूकता कशी बाळगावी याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सौ. मेघा बाणे, प्राचार्य. डॉ. राजेश जगताप, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा.चंद्रशेखर बाबर, विभागप्रमुख प्रा.अमर कुलकर्णी आणि डॉ. अमोल उबाळे यांनी योगदान दिले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी हा उपक्रम जागरूकता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. एस. डी. कदम आणि प्रा. पी. पी. राणे यांनी काम पाहिले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. वैभव नाईक, उपाध्यक्षा सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त श्री. मंदार सावंत यांनी आयोजकांचे कौतुक केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स