ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
ओरस येथे शिक्षक भारतीचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

ओरस येथे शिक्षक भारतीचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न.

प्रकाशन: 21 Jan 2025 04:26 PM
वाचन संख्या 37

मसुरे | प्रतिनिधी : शिक्षण सेवक कालावधी रद्द करा, किंवा कालावधी कमी करून मानधन वाढ करा हा महत्त्वपूर्ण ठराव महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेच्या ओरोस येथील त्रैवार्षिक अधिवेशनात मांडण्यात आला. एकूण २१ ठराव या अधिवेशनात मांडण्यात आले. महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन ओरस येथील इच्छापूर्ती कार्यालयात पार पडले.

अधिवेशनाचे उद्घाटन भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संघटनेचे राज्य संघटक किसन दुखंडे यांच्या हस्ते पार पडले. या अधिवेशनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे यांनी ठराव वाचन केले. या अधिवेशनाचे वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक भारती संघटनेने पहिलाच ठराव शिक्षण सेवकांच्या हक्कासाठी मांडला. शिक्षण सेवक कालावधी रद्द करावा किंवा शिक्षण सेवकाचा कालावधी कमी करून मानधन वाढ करावी हा महत्त्वपूर्ण ठराव या अधिवेशनात लक्षवेधी ठरला. शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणे. राज्यातील पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना तात्काळ पदवीधर वेतनश्रेणी देण्यात यावी. प्रधानमंत्री पोषणशक्ती योजना अंतर्गत शाळांना नियमित पुरवठा करणे बाबत. शालेय परिसर व स्वच्छतागृह यांच्या स्वच्छतेसाठी नियमित मदतनीस नियुक्त करणेबाबत. २००५ च्या अधिसूचनेनुसार सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे. शालेय वीज शासनामार्फत भरणे. सेवा सातत्य साठी पात्र शिक्षकांना वेतन संरक्षणाचा लाभ देणे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देणे. २००५ पूर्वीच्या शिक्षण सेवकांची DCPS खाती जमा असलेली मासिक कपात व सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात वर्ग करण्याबाबत. निमशासकीय वस्तीशाळा शिक्षकांचे नियुक्ती शासन दिनांकानुसार ग्राह्य धरून त्यांना फरक देण्यात यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रशिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ विना विलंब मिळणे बाबत. गटशिक्षणाधिकारी गटविस्तार अधिकारी केंद्रप्रमुख पदे भरण्यात यावी. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना देय असणारी वेतन वाढ लागू करण्यात यावी. महाराष्ट्र दर्शन व प्रवास भत्ते देण्यासाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करून द्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बालकला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाचे आयोजन ३२ जानेवारी २०२५ पूर्वी करावे
. शिक्षकांची अशैक्षणिक कामे रद्द करावीत. विद्यार्थ्यांना वेळ देऊन त्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी प्रशासकीय कामांसाठी आठवड्यातून एकच दिवस देण्यात यावा. पात्र शिक्षकांना निवड वेतनश्रेणी देण्यात यावी. शिक्षण सेवकांना प्रसूती रजेचे लाभ शासन निर्णयानुसार देण्यात यावेत.

यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले की, या अधिवेशनात मांडण्यात आलेले २१ ठराव हे महत्त्वपूर्ण ठराव असून पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून शासनापर्यंत हे ठराव पाठवू तसेच शिक्षण सेवकांच्या मानधन वाढी संदर्भात निश्चितच ठोस भूमिका घेऊ असे आश्वासन देत शिक्षण क्षेत्रातील कामाचे कौतुक केले. दरम्यान शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शाळांना आदर्श शाळा तर शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी नव्या जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अधिवेशनाचे प्रास्ताविक मंगेश खांबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन सत्यजित वेतूर्लेकर यांनी केले तर आभार दिनकर शिरवलकर यांनी मानले. या अधिवेशनाला जिल्ह्यातून शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स