सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या साहसी क्रीडा जिल्हाध्यक्षपदी श्री मायकल डिसोजा ..!
पर्यटन व्यावसायिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिली माहिती..
मालवण | वैभव माणगांवकर : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून शासन स्तरावर घोषीत होऊन जवळपास अडीच दशके होत आली आहेत. तरिही जिल्ह्याच्या साहसीक्रीडा प्रकारांमध्ये म्हणावी तशी प्रगती झालेली नाही .
पर्यटन महासंघाच्या माध्यमातून सदर क्षेत्रात शाश्वत विकास होऊन साहसी पर्यटन क्रीडा प्रकारामध्ये रोजगार निर्मिती व जिल्ह्यातील साहसी पर्यटन देश विदेशात पोचविण्यासाठी महासंघातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी यासाठी आवश्यक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत.या विषयी हॉटेल सायबा मालवण येथे झालेल्या सभेत साहसी क्रीडा जिल्हाध्यक्ष म्हणून आंबोली येथील श्री मायकल डिसोजा यांची निवड करण्यात आली. या निवडीच्या घोषणेवेळी तिथे महासंघ उपाध्यक्ष श्री कमलेश चव्हाण ,मालवण तालुका अध्यक्ष श्री अवि सामंत, शहर अध्यक्ष श्री मंगेश जावकर ,श्री उत्तम नार्वेकर,श्री संतान अल्मेडा,श्री स्वरुप वाळके, श्री वामन पालेकर,श्री राकेश अमरूस्कर ,श्री जेरोल्ड डीसोजा, श्री सहदेव सनाम ,श्री पास्कु देसा तसेच अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते. श्री.बाबा मोंडकर यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती देऊन महासंघाची भविष्यकालीन सक्षमता स्पष्ट केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)