ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आंदुर्ले गावची मिताली परब बनली सनदी लेखापाल.

आंदुर्ले गावची मिताली परब बनली सनदी लेखापाल.

प्रकाशन: 03 Jan 2025 01:13 AM
वाचन संख्या 76

मसुरे | प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावची सुकन्या व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या कु. मिताली हर्षिता हरिश्चंद्र परब हिने सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेमध्ये यश मिळवले आहे . देशपातळीवरील कठीण परीक्षांपैकी ही एक कठीण परीक्षा आहे. मिताली हिने अतिशय मेहनतीने व चिकाटीने हे यश मिळवले आहे.

शैक्षणिक स्तरावर यश मिळवत असताना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून तिने भरतनाट्यम विशारद ही पदवी सुद्धा प्राप्त केलेली आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना ती म्हणते की अभ्यासात सातत्य आणि प्रयत्न करत राहणे खूपच महत्त्वाचं आहे, हे करण्याची तुमची तयारी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे कठीण नाही. यावर्षी देशपातळीवर घेतलेल्या चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेचा १३. ४४% एवढ्या अल्प टक्केवारीत निकाल लागला असून संपूर्ण देशभरातून केवळ ११,५०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ज्यामध्ये कु. मिताली हिचा समावेश आहे. आंदुर्ले गावचे विधीज्ञ श्री. आनंद रमाकांत परब यांची ती पुतणी आहे. तिच्या या यशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून आणि परब परिवार यांच्या मित्र परिवाराकडून तिचे कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स