ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी सर्वांचा पाठिंबा कायम असू द्या : संदीप परब.

रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी सर्वांचा पाठिंबा कायम असू द्या : संदीप परब.

प्रकाशन: 30 Dec 2024 10:05 PM
वाचन संख्या 96

जीवन आनंद संस्थेचे संदीप परब यांची बॅरिस्टर नाथ पै सेवांगण व परिवर्तन संस्था मुंबई ह्यांच्या तर्फे स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण जाधव सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्राप्ती नंतर प्रतिक्रिया.

प्रतिनिधी : सामाजिक कार्यकर्ते संदीप परब यांना बॅरिस्टर नाथ पै सेवांगण व परिवर्तन संस्था मुंबई यांच्या तर्फे स्वातंत्र्य सैनिक लक्ष्मण जाधव सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी संदीप परब यांना बॅरिस्टर नाथ पै सेवांगण अध्यक्ष डाॅ. देवदत्त परुळेकर यांच्या उपस्थितीत व प्रभाकर नारकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ३० डिसेंबर रोजी बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, कट्टा येथे संपन्न झालेल्या समारंभात पर्यावरणपूरक विकास चळवळीतील सत्यजीत तांबे यांनाही सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने गौरवण्यात आले.

कुडाळ येथील संदीप परब रस्त्यावर राहणाऱ्या निराधार वृद्ध तसेच मानसिक विकलांगांना आधार देण्याचे काम कित्येक वर्ष करीत आहेत. त्यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील पणदूर गावात जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून संविता आश्रमाची स्थापना केली आहे. सध्या मुंबईत चार, गोव्यात दोन ठिकाणी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन ठिकाणी त्यांच्या पुढाकाराने आश्रम सुरू आहेत. आतापर्यंत ५१० निराधारांना उपचार करून, घरी पोहोचविले आहे. तर ३०० हून अधिक निराधार त्यांच्या आश्रमात आश्रयाला आहेत.

परिवर्तन मुंबई या संस्थेतर्फे गेले १९ वर्षे दिवंगत स्वातंत्र्यसैनिक तसेच ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते लक्ष्मण जाधव यांच्या स्मृत्यर्थ सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. १० हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्कार प्राप्ती नंतर संदीप परब म्हणाले की रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी तुम्हा सर्वांचा मला मिळणारा पाठिंबा महत्वाचा आहे व तो माझ्यासोबत कायम असू द्या. या पुनर्वसन कामात अनेक अडथळे आहेत व विविध गरजा आहेत. यासाठी सेवाभावी पणे सहकार्य केलेल्या सर्वांचाच हा पुरस्कार आहे परंतु हे काम इथे थांबत नसून या पुरस्काराने माझी जबाबदारी आणखी वाढली आहे व त्यासाठी तुम्हा सर्वांची यथाशक्ती साथ महत्वाची आहे. संदीप परब यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे सर्वांना नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शुभेच्छा दिल्या आहेत.

या कार्यक्रमाला बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे व परिवर्तन मुंबईचे पदाधिकारी, मान्यवर व नागरीक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स